जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध* *अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम बाळगावा. : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

*जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध*
*अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम बाळगावा*
*: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

*नाशिक जनमत , दि. 26 मार्च 2026 (जिमाका वृत्तसेवा)* : सध्याच्या परिस्थितीच्या जिल्ह्यात व शहरात घरगुती गॅस सिलिंडर तुटवड्याबाबत अफवा पसरत असल्यामुळे गॅस एजन्सीकडे नागरिकांची गर्दी वाढली आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील गॅस साठ्याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी घरगुती गॅस सिलिंडरचा खालीलप्रमाणे साठा उपलब्ध आहे :
• *भारत गॅस :* एकूण लाभार्थी 10,78,107 , एकूण एजन्सी 63, उपलब्ध साठा 18,600
• *एचपी गॅस :* एकूण लाभार्थी 7,63,800 , एकूण एजन्सी 42, उपलब्ध साठा 13,795
• *इंडेन गॅस :* एकूण लाभार्थी 1,52,801 , एकूण एजन्सी 29 , उपलब्ध साठा 1,028
*एकूण* : लाभार्थी 19,94,708 एकूण एजन्सी 134 | उपलब्ध साठा 33,423
जिल्ह्यातील सर्व गॅस कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींना गॅस पुरवठा सुरळीत व अखंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी जबाबदारीने वर्तन करावे. अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हा प्रशासन व इंधन कंपन्या घरगुती गॅस सिलिंडर साठा सुरळीत व कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे

