महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने* *आवश्यक उपाययोजना कराव्यात* *:जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

*महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने*
*आवश्यक उपाययोजना कराव्यात*
*:जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*
*नाशिक, दि. 13 फेब्रुवारी 2026 जन्मत( वृत्तसेवा):* रविवार 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाशिवरात्री व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कुंभमेळा साहित्य मागणी प्रस्तावबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, पोलीस निरिक्षक सोहन माचरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे त्र्यंबक नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी विजय जाधव, नगर अभियंता स्वप्नील काकड, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने शहरात स्वच्छता ठेवावी. तसेच सर्व स्थानिक सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंत्रणा सज्ज ठेवावी. रथ मिरवणूक मार्गात गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
(जाहिरात)
सार्वजनिक सूचना
सर्व संबंधितांना कळविण्यात येते की,
स्व. धनराज गोविंदा बागुल रा. नाशिक यांचे दिनांक ०३/०२/२०२० रोजी निधन झाले आहे.
त्यांच्या नावावर नोंदणीकृत खालील तपशीलाचे टू-व्हीलर वाहन आहे : Hero Honda ( Passion Pro )
वाहन क्रमांक :MH.15 DH 8386
कंपनी / मॉडेल : Hero Honda Passion Pro
नोंदणी कार्यालय : RTO office Nashik
सदर वाहन त्यांच्या पत्नी सौ. विमल धनराज बागुल यांच्या नावावर हस्तांतरित करावयाचे आहे.
या हस्तांतरणाबाबत कोणास काही आक्षेप / हक्क / दावा असल्यास, ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा कोणताही आक्षेप नाही असे समजून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
नाव : निलेश धनराज बागुल
पत्ता : नंदी रेसिडेन्सी पवार मळा अश्वमेधनगर आरटीओ ऑफिस नाशिक
मोबाईल नं. : 7066145515
दिनांक : 13/02/2026
ठिकाण : नाशिक
स्वाक्षरी : निलेश बागुल
(वारस / अर्जदार)
तसेच नाशिक महानगपालिका, नाशिक स्मार्ट सिटि, पोलीस विभाग (नाशिक शहर व ग्रामीण), आरोग्य विभाग (नाशिक), जिल्हा परिषद (नाशिक), त्र्यंबकेश्वर नगरपरिषद व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभ मेळा प्राधिकारणामार्फत आपत्ती व्यवस्थापन सहसाहित्यासाठी एकूण रूपये 373.92 कोटी निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने पाठविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले.
