ब्रेकिंग

सावतानगर येथील शॉपिंग मार्केटच्या समस्यांबाबत नगरसेवक मुरलीधर भामरे यांना निवेदन; प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन

सावतानगर येथील शॉपिंग मार्केटच्या समस्यांबाबत नगरसेवक मुरलीधर भामरे यांना निवेदन; प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन

सिडको  नाशिक जनमत प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक २५, सावतानगर परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे शॉपिंग मार्केट येथील गाळाधारकांच्या प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्रभागाचे नगरसेवक श्री. मुरलीधर (तात्या) भामरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी नगरसेवकांनी प्रत्यक्ष मार्केटला भेट देऊन पाहणी केली आणि सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

शॉपिंग मार्केटमधील व्यावसायिकांनी अनेक गंभीर समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापनाचा अभाव ही मोठी समस्या आहे. परिसरात नियमित कचरा गाडी येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे, ज्याचा परिणाम व्यवसायावर आणि आरोग्यावर होत आहे. तसेच मार्केटसमोरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, तेथे तातडीने काँक्रिटीकरण आणि दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरात पडलेले जुन्या बॅनर्सचे तुकडे आणि सुका कचरा यामुळे आगीची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याचे प्रसंगी उपस्थितांनी बोलून दाखवले असून संपूर्ण शॉपिंग सेंटर परिसर ‘कचरामुक्त’ करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

 

गाळाधारकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक मुरलीधर तात्या भामरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “परिसराची स्वच्छता आणि रस्ते विकास हे आमचे प्राधान्य आहे. कचरा गाडी नियमितपणे येईल याची व्यवस्था केली जाईल आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण लवकरच हाती घेतले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.​​याप्रसंगी शॉपिंग गाळा मालक केनेकर नाना, दत्तात्रय देवरे, नाना ददलानी, संतोष ढवळे, संतोष अहिरे, सुभाष निकम, सुनील गुप्ता, सलामत अली, शैलेश खैरनार, सुनील देशमुख यांच्यासह ललिता चौधरी, आशा खैरनार व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे