ब्रेकिंग

जळगाव मध्ये फार्मसी विद्यालयात प्राचार्याने मारल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या.

लिहून ठेवली सुसाईड नोट.

नाशिक जन्मत       प्रतिनिधी    बोदवड येथील विद्यार्थ्याला जळगाव येथील  फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मारल्याने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे यामुळे जळगाव मध्ये पालक वर्गात खळबळ उडाली  आले आहे.

मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मित्र असलेल्या रामूला सांगितले की माझी स्टोरी इंस्टाग्राम वर टाक असेही चिट्ठी मध्ये  लिहून ठेवले आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की

प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केल्याने शहरातील देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि. १६) ही घटना घडली. त्याच्या खिशात सापडलेल्या ‘सुसाइड नोट’मध्ये प्राचार्यांनी मारहाण केल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून प्राचार्य योगेश पवार विरोधात रामानंदनगर पोलिस

 

ठाण्यात

 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल करण्यात आला. गुन्हा

 

बोदवड येथील शेतकरी कुटुंबातील श्याम सदर कॉलेजातील द्वितीय वर्षाला शिकत होता. तो जळगावात भाड्याने खोली घेऊन राहत होता. रविवारी त्याचे रुममेट गावाला गेल्याने खोलीवर तो एकटाच होता. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात म्हटले आहे की, माझी चूक नसताना प्राचार्यांनी मला

 

सर्व शिक्षक, स्टाफ आणि मित्रांसमोर अपमानित करून मारहाण केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना, समोरचा मुलगा मुले घेऊन आला तरी प्राचार्यांनी त्याला काहीच म्हटले नाही. उलट मलाच पीव्हीसी पाईपने मारले आणि शिवीगाळ केली. गुरू मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही मारत असे नमूद करीत आपल्या मित्राला उद्देशून, ‘रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी ‘इन्स्टा’वर टाक’, अशी भावनिक सादही घातली. वडिलांच्या तक्रारीनुसार प्राचार्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे