महाराष्ट्र

नाशिक करांना मेट्रो साठी करावी लागणार प्रतीक्षा. निर्णय पुन्हा लांबणीवर

 

 

नाशिक : चार वर्षांपूर्वी नाशिक शहरात लवकरच मेट्रो येणार यासाठी सर्वे देखील केला व तसा प्लान देखील काढला होता. विविध भागातून मेट्रो जाणार अशा प्रसार माध्यमांच्या बातम्या देखील आल्या त्यामुळे नागरिकांमध्ये मेट्रो विषयी कुतुवलं वाढले परंतु अजूनही मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी नाशिक शहरात ट्रॅफिकची समस्या वाढत आहे

शहराचा वाढता विस्तार

 

लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी टायरबेस्ड मेट्रो की नियमित मेट्रो याबाबतचा निर्णय पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे.

मेट्रोसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.२१) होणारी मंत्रालयातील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री दौऱ्यावर असल्यामुळे महापालिकेला पत्र पाठवून पुढील बैठकीसंदर्भात लवकरच कळविले जाईल, असे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी नीलेशकुमार चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व ‘महामेट्रो’ ने नव्याने वाहतूक सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यानुसार तयार झालेल्या प्रकल्प अहवालाचे सादरीकरण केले जाणार होते.. लवकरात लवकर नाशिक शहरात मेट्रो चालू व्हावी अशी नाशिककरांना आशा आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे