क्रिडा व मनोरंजन

क्रीडा व कला गुणांमुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो* .:उपायुक्त चंद्रशेखर पगारे*

 

 

*क्रीडा व कला गुणांमुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो*

*:उपायुक्त चंद्रशेखर पगारे*

*जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा झाला शुभारंभ*

 

 

*नाशिक, दि.20 जानेवारी 2026(जिमाका वृत्तसेवा):* खेळ मानवाच्या जीवनात महत्वाचे स्थान राखतात. क्रीडा व कला गुणांमुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक, बौद्धीक आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन महिला व बाल विकास नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले.

 

स्व. मीनाताई ठाकरे ठाकरे स्टेडियम येथे आज जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 चे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, महिला व बाल विकास अधिकारी सतीश मुंढे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समिरा येवले, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड.मिलिंद बाबर, महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक चे जिल्हा समन्वयक अधिकारी उल्हास पाटील, बाल कल्याण समिती सदस्य गोपाळ शिंपी, ॲड.भगवान एलमामे, ॲड. पल्लवी घुले, शोभा पवार, गणेश कानवडे, सहाय्यक लेखाधिकारी संपत शिंदे, विधी सल्लागार ॲड. अशोक पवार, परिविक्षा अधिकारी बाल विकास प्रभाकर गावित , संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीज यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

खेळांमुळे शिस्त, वेळेचे भान, संघभावना, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना निर्माण होते. संघखेळांमुळे एकत्र काम करण्याची सवय लागते, तर वैयक्तिक खेळ आत्मनिर्भरता आणि आत्मनियंत्रण शिकवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा व कला गुण आत्मसात करावेत. असे उपायुक्त श्री पगारे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

 

बाल महोत्सवात, धावणे, कबड्डी, खो-खो, लांब उडी, गोळा फेक, बुद्धिबळ, कॅरम, निबंध, वत्कृत्व, हस्ताक्षर, गायन, चित्रकला इत्यादी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री दुसाने यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती येवले यांनी मानले.

 

या तीन दिवसीय महोत्सवासाठी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी,चाईल्ड हेल्प लाईन नाशिक, सखी केंद्र, हे परिश्रम घेत आहेत. तसेच विपला फाऊंडेशन, मिरकल फाऊंडेशन, प्रेरणा संस्था, निर्णय कमिटी इंटिग्रेट फाऊंडेशन, सेंट्रल फॉर सोशल अँड बेहविअर चेंज कम्युनिकेशन SBC 3 यांचे सहकार्य लाभले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे