ब्रेकिंग

कौटुंबिक कारणातून लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून.

 

 

 

नाशिक जन्मत  मोठा भाऊ आई ला नेहमी बोलत असतो या कारणाने लहान भावाने मोठ्या भावाचा खून करण्याची घटना घडल्याने नाशिक शहर हादरले आहे.लहान भावाने मोठ्या भावाचा खून करण्याची घटना आडगाव येथील सद्भावना हौसिंग सोसायटी येथे बुधवारी (दि. २१) दुपारी तीन वाजता घडली.

 

संदीप गायकवाड (वय ३३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून करणारा सख्खा लहान भाऊ अरविंद गायकवाड याला आडगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मृत संदीप आणि संशयित अरविंद हे दोघे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचे मुलगे आहेत. दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सोसायटीमध्ये दोघा भावांचा वाद झाला. त्यावेळी घरातील कांदे कापण्याच्या चाकूने अरविंदने संदीपवर वार केले, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. संशयित अरविंद त्यावेळी नशेमध्ये होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांची आईदेखील घरीच होती. आईला हृदयविकाराचा त्रास आहे असे समजते. जानेवारी महिन्यातील शहरातील ही तिसरी खुनाची घटना आहे. तिन्ही खून कौटुंबिक कारणांतून झालेले आहेत. यासंदर्भात पुढील तपास आडगावचे वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दरम्यान कौटुंबिक कारणातून खून च्या घटनेमध्ये वाढ होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे