बांधकाम परवानगीबरोबरच मिळणार एनए प्रमाणपत्र; १ डिसेंबरपासून प्रक्रिया.
बांधकाम परवानगीबरोबरच मिळणार एनए प्रमाणपत्र; १ डिसेंबरपासून प्रक्रिया
प्रतिनिधी । नाशिक जन्मत बिनशेती परवानगी देण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यासाठी जिल्हा प्रशासनान
बांधकाम परवानगी देतानाच बिनशेती (एनए) परवानगी ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे. १ डिसेंबरपासून हा निर्णय नाशिक जिल्ह्यात लागू केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बीपीएमएस प्रणालीद्वारे ही परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे बिनशेती परवानगीसाठी होणारा विलंब टळणार असून, गैरप्रकारांनाही चाप बसणार असल्याने नागरिकांचे पैसेही वाचतील.
बिगरशेती परवानगी देण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन केले जात आहे. याकरिता बीपीएमएस प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सध्या बांधकाम परवानगीसाठी महापालिका
(यासाठी एनए महत्त्वाचे
सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असे म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असेही म्हणतात. या रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी ठराविक ‘रूपांतरण कर’ आकारला आतो.)
हद्दीत प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याला परवानगी दिली जाते. ही परवानगी दिल्यानंतर महापालिकेकडून संबंधित विकासकाला बिनशेती परवानगीसाठी
पत्र दिले जाते. ते पत्र घेऊन संबंधित विकसकाला पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे महसूल विभागाकडे बिनशेती परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
दाखल कागदपत्रांची छाननी आणि तपासणी केल्यानंतर वर्ग-१ ची जमीन असेल तर बिनशेती परवानगी मिळण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो. अनेकदा विनाकारण त्रुटी काढून त्यात बिनशेती परवानगी देण्यास विलंब केला जातो. त्यातून गैरप्रकार होत असल्याचे जिल्हा प्रशानाच्या निदर्शनास आले आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेत आता १ डिसेंबरपासून एनए परवानगी ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला आहे.