ब्रेकिंग

गौळाणे रोडवर दरोडा; ६० हजार रु. लांबवले कपाटाचे कुलूप तोडले सोळा तोळ्याचे दागिने लंपास.

निफाड येथे शेतीच्या कामाला गेले होते. गज कापून केली चोरी.

 

 

गौळाणे रोडवर दरोडा; ६० हजार रु. लांबवले कपाटाचे कुलूप तोडले

प्रतिनिधी | नाशिक जनमत शासकीय नोकरीतून रिटायर झालेल्या व्यक्तीच्या घरातून साठ हजार रुपये व 16 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे

नाशिक शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

पाथर्डी-गौळाणेरोड परिसरातील पांडववन येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून सोन्याच्या १६ तोळे दागिन्यांसह ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रंगनाथ अर्जुन मोरे (रा. पांडववन, गौळाणे – पाथर्डी रोड) हे कुटुंबासह ६ फेब्रुवारीला निफाड येथे शेतीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश करत ऐवज लंपास केला. मोरे कुटुंबीय ९ फेब्रुवारीला सायंकाळी घरी परतले

 

असता, हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. परिसरात सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून १७ ग्रॅमचे मंगळसूत्र, २५ ग्रॅमचा नेकलेस, ३० ग्रॅमचे कडे, १२ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची नथ आणि कानातील झुमके व टॉप्स, चांदीच्या साखळ्या, ६०,००० रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला.) या घटनेमुळे परिसरात घाबराट निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे