बंटी तिदमे चा गैरसमज दूर झाल्याचे सांगत राजीनामा मागे; विरोधी गटही आक्रमक

नासिक जनमत महापौर निवडणुकीनंतर शिंदे सेनेमध्ये महापौर पद यावरून दोन गट निर्माण झाले असून महानगर प्रमुख बंटी तिदमे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार अशा बातम्या प्रसार माध्यमात प्रसारित झाल्या होत्या काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर पडदा पडला आहे.
नाशिक महापालिकेचे उपमहापौरपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्याः तसेच थेट शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा स्वीकारणाऱ्या प्रवीण तिदमे यांनीही भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याप्रमाणेच घूमजाव केले आहे. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा गैरसमज दूर केला असून, त्यांच्या आदेशामुळे मी महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नाही, असे तिदमे यांनी स्पष्ट केले. मात्र, तिदमे यांच्या राजीनामा ‘स्टंट’ मुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेनेत उपमहापौरपदाच्या निवडीमुळे नाराज झालेल्या प्रवीण तिदमे यांनी सोमवारी (दि. ९) महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. भाजप शहराध्यक्ष केदार यांच्यापाठोपाठ शिंदे गटातही
उपमहापौरपदावरून वाद झाल्याने दोन्ही पक्षांतील गटबाजी उफाळून आली होती.
सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तिदमे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आपली उमेदवारी डावलली गेल्याने समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी ‘नॉट रिचेबल’ झालो होतो. माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेन चे
सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी, “बंटीवर अन्याय होणार नाही, त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगा”, असा निरोप कुटुंबीयांना दिला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी मी फोनवर संपर्क केला. विलास शिंदे यांना उपमहापौर
करण्याचे आदेश मीच दिले असून, तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तू मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस,’ असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर आपण निर्णय बदलला आहे, असा दावा प्रवीण तिदमे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेप्रसंगी नगरसेविका हर्षदा गायकर, नगरसेवक भागवत आरोटे, सुवर्णा मटाले, डॉ. पूनम महाले, अस्मिता देशमाने, योगेश बेलदार आदी उपस्थित होते.
गटबाजीवर आज मुंबईत चर्चा
उपमहापौरपदावरून तिदमे यांच्या राजीनामा नाट्यामुळे शिंदे गटातील गटबाजी उफाळून आली आहे. ‘पक्षात सुरू झालेल्या गटबाजीवर चर्चा करण्यासाठी पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासह सर्व नगरसेवकांना मंगळवारी (दि.१०) भेटण्यासाठी बोलावले आहे. उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षाचा आणि गटनेतेपदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला वापरून सर्वांना न्याय देण्याची मागणी आम्ही पक्षाकडे मांडणार आहोत’, असे तिदमे यांनी सांगितले. तर, तिदमे यांच्या दाव्याला उत्तर देण्यासाठी विरोधी गटही सरसारवला आहे. तिदमे शिवसैनिक कधीपासून झाले, ते आधी कोणत्या पक्षात होते, याची कुंडली एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

