वन विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप.
आई-वडिलांच्या वेदना चा अंदाज वन विभागाला येईल का. एका महिन्यात दोन बालकाचा बळी
संग्रहित छायाचित्र.
नाशिक जन्मत नाशिकच्या वडनेर दूमला भागात एका महिन्यात दोन लहान बालकांचे बळी बिबट्यामुळे गेलेले आहे. यामुळे या परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाच्या कारभारावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे
दोन्ही घटनांमध्ये बिबट्या आपल्या जवळ समोर असलेल्या लहान बाळांना आपल्या डोळ्यासमोर बिबट्या घेऊन जात असल्याचे दिसत आहे. यानंतर लहान बाळाचे शव आई-वडिलांना दिसत असल्याने अतिशय वेदनादायी दृश्य समोर आलेले आहे. मंगळवारी रात्री वडनेर कॉटर मधून दोन वर्षाच्या श्रुतीक लाही वडील गंगाधरण यांच्या डोळ्यासमोर बिबट्याने उचलून नेले. यानंतर 300जवानांनी बालकाचा शोध घेतला . परंतु त्या रात्री बालक मिळून आला नाही. दुसऱ्या दिवशी 17 तासानंतर एका वाळलेल्या झाडाच्या खाली गवतावर बाळाचे प्रेत मिळून आले. या घटनेनंतर वन विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक परिसरामध्ये पकडलेले बिबटे जवळ सोडून देत असल्याने अशा घटना घडत असल्याचे नागरिक बोलत आहे. पाथर्डी फाटा वडनेर दुमला जय भवानी रोड देवळाली गाव पिंपळगाव खांब या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
रक्षाबंधनच्या आगल्या दिवशी एका बालकाचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळेस काही दिवसातच नरभक्षक बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर होते. पिंजरे लावून वनविभाग बिबट्याला पकडले देखील. परंतु एक महिन्याच्या पुन्हा बिबट्याने एका बालकाचे बळी घेतल्याने वन विभागा वर संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीचे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. बिबट्याने श्रुतीचा बळी घेतल्यानंतर महिला वर्गामध्ये आक्रोश निर्माण होत आहे. वन विभागाने नरभक्षक बिबट्याला ताबडतोब पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही दिवसापूर्वी तरस हा दुसरा प्राणी देखील जय भवानी रोडवर दिसून आला आहे. डोंगर दर्यातील प्राणी नाशिक शहराकडे वळू लागले आहेत. कुत्रे वासरं यांची शिकार करून ते पोट भरत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान मनुष्याचे रक्त त्यांच्या तोंडाला लागले असून दिवसेंदिवस ते आता लहान बालकांवर नागरिकांवर हल्ले करत असल्याचे दिसत आहे. दिवसभर झाली ती लपलेले बिबटे रात्री सात नंतर बाहेर पडतात व मिळेल त्याला भक्ष करत असल्याचे दिसत आहे वन विभागाने आपला कारभारामध्ये सुधार करावी. इस्र झालेले बिबटे ताबडतोब पकडण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रुतीच्या आई वडिलांची अवस्था मुलाच्या निदानामुळे बिकट झालेली आहे. गेल्या एक महिन्यात श्रुती क गंगाधरण. आयुष्य भगत. सारंगधर थोरात या तीन बालकांचे बळी गेलेले आहेत.