ब्रेकिंग

आयमा अध्यक्ष पदाची राजेंद्र पानसरे यांनी स्वीकारली सूत्रे.

राजेंद्र पानसरे यांनी स्वीकारली सूत्रे

.  नाशिक जन्मत प्रतिनिधी

 

उद्योजकांची महत्त्वाची संघटना असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी मागील अध्यक्ष ललित बूब यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

 

‘आयमा’ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. नूतन अध्यक्ष राजेंद्र पानसरे, मागील अध्यक्ष ललित बूब, निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश ब्राह्मणकर, उपाध्यक्ष उमेश कोठावदे, बीओपीपी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, प्रमोद वाघ, गोविंद झा, निखिल पांचाळ, योगिता आहेर, हर्षद बेळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत मागील इतिवृत्तासह अन्य विषय. मंजूर करण्यात आले. बूब यांनी दोन वर्षांतील कामकाजाचा आढावा घेतला. ब्राह्मणकर यांनी विजयी उमेदवारांची

 

आयमा वार्षिक सर्वसाधारण सभेत पदग्रहण

 

घोषणा करून प्रमाणपत्रे प्रदान केली. धनंजय बेळे, राजकुमार जॉली, जे. आर. वाघ, एस. एस. बिरदी, एन. डी. ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

सरचिटणीसपदी संजय महाजन

 

‘आयमा’च्या सरचिटणीसपदी ज्येष्ठ उद्योजक संजय महाजन यांची निवड करण्यात आली. पासनरे यांच्या हस्ते कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे