विद्यार्थांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करावी*
*विद्यार्थांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करावी*
*:मंत्री छगन भुजबळ*
*विविध विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण संपन्न*
नाशिक, दि. 21 सप्टेंबर, 2025 (नंशिक जन्मत : आधुनिक युगात तंत्रज्ञान झापाट्याने विकसित होत असतांना शैक्षणिक पद्धतीत अमुलाग्र बदल घडतांना दिसत आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी तंत्रज्ञावर आधारीत शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करावी. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण तसेच पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषद शाळेतील स्मार्ट क्लासरूमच्या उद्घाटन प्रसंगी शाळेत आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री भुजबळ बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच.बी.चव्हाण, प्रशांत कुलकर्णी, यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री भुजबळ म्हणाले की, आजचे युग हे विज्ञानाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय) प्रणालीचा वापर सर्वच क्षेत्रात होतांना दिसत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विविध जागतिक भाषांचे शिक्षण देण्यात येत आहे ही बाब अतिशय कौतुकास्पद असून या भाषांचे ज्ञान अवगत केल्यामुळे भविष्यात परेदशात विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहेत. पिंपळगाव लेप शाळेसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. शेतकऱ्यांनाही आता शेतीविषयक अनेक गोष्टींची माहिती तंत्रज्ञानामुळे मोबाईलवर देखील प्राप्त होत आहे. त्याही पुढे आता एआय तंत्रज्ञानाचा वापर सर्व क्षेत्रात अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचे मंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.
*जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून विचारलेल्या प्रश्नांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिलखुलास उत्तरे*
पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या शालेय शिक्षणासोबत त्यांच्या वाटचालीबाबत अनेक प्रश्न विचारत संवाद साधला. यावेळी मंत्री श्री भुजबळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. तसेच आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरासाठी १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे कामाचे लोकार्पण*
लोकार्पण प्रसंगी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, येवला शहराला अखंड वीज मिळावी यासाठी या उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफार्मर कार्यान्वित झाल्यामुळे शहरातील नागरिकांना घरगुती वापरासाठी तसेच व्यावसायिक वापरासाठी मुबलक वीज उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व सुधारीत वितरण क्षेत्र योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून अधिक वीज निर्माण केली जात असल्याने पुढील काळात स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
*या कामांचे झाले लोकार्पण*
1. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव लेप शाळेतील स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन
2. पिंपळगांव लेप येथील तलाठी कार्यालयाचे लोकार्पण करणे (रु. ३५ लक्ष)
3. पिंपळगांव लेप, ता. येवला येथे स्थाानिक विकास निधी अंतर्गत बिरोबा मंदिर जवळ सभामंडप बांधणे कामाचे लोकार्पण (रु. १५ लक्ष)
4. पिंपळगांव लेप ते शेवगे ३०५४ योजनेंतर्गत रस्त्यांचे कामाचे भुमीपूजन (रु. ३७ लक्ष)
5. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या माध्यमातून पाटोदा रोड १३२ केव्ही सबस्टेशन मध्ये ०५ एमव्हीए च्या ट्रान्सफार्मरची क्षमतावाढ करुन त्याठिकाणी येवला शहरासाठी १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे कामाचे लोकार्पण ( रु. ११० लक्ष)