ब्रेकिंग

ओझर खडकजाम येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. दोन गंभीर जखमी. 

ओझर खडकजाम येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. दोन गंभीर जखमी

 

चांदवड : प्रतिनिधी नाशिक जन्मत   मोठ्या प्रमाणात सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सर्वत्र दिसत आहे सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर कळवण देवळा सटाणा इत्यादी सर्व भागांमध्ये बिबट्यांची दर्शन मोठ्या प्रमाणावर लागले आहे. मागे काही दिवसापूर्वी नाशिक शहरात देखील बिबट्यांचे दर्शन झाले आहे. दरम्यान ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण झाले आहे. काल

 

 

 

तालुक्यातील खडकओझर येथील विष्णू वस्ती शिवारात कांद्याला पाणी देत असताना मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेबारा वाजता दोघा सख्ख्या भावांवर बिबट्याने हल्ला केला. बबन मोतीराम पगार (५६) व नंदू मोतीराम पगार (५०) हे दोघे भाऊ यात जखमी झाले. आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावल्याने बिबट्याने पळ काढला. दोघांना वडाळीभोई येथील उपकेंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या या ठिकाणी लपत असतात. दिवसभर लाईट नसल्याने रात्री बे रात्री कांदा तसेच गहू द्राक्ष पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते. शेती कर्ण देखील बिबट्यांच्या धाकामुळे धोकादायक झाले आहे. या परिसरात वन विभागाने ताबडतोब पिंजरे लावावे. या भागातील काही नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी दोन बिबटे असल्याचे सांगण्यात येत आहे. व हे बिबटे धष्टपुष्ट आहेत दहा लोकांना आवरणार नाही. असे हे बिबट असल्याचे सांगण्यात येते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे