पत्नीने केला नवऱ्याचा खून. प्रियकराच्या मदतीने घरातच पुरला मृत्यू देह.
दृश्यम चित्रपटाप्रमाणे केली हत्या.
प्रतिनिधी दृश्यम चित्रपटाला शोभावी असे कृत्य नालासोपारातील एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा फोन करून प्रेत घरातच पुरला नालासोपाऱ्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे घरातच गुप्तपणे पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. पेल्हार पोलिसांनी पत्नी गुडिया चौहान आणि तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा यांना पुणे येथून अटक केली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव विजय चौहान असून या दांपत्याला चेतन नावाचा आठ वर्षांचा मुलगाही आहे.
नालासोपारा पूर्वेच्या धानीव बाग परिसरातील ओम साई वेल्फेअर चाळीत चौहान हे दांपत्य आपल्या आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होते. मृताची पत्नी गुडिया हिचे शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत होता. त्यामुळे गुडियाने
प्रियकरास सोबत घेऊन पती विजय चौहान याची राहत्या घरातच हत्या केली. ही घटना १५ दिवसांपूर्वी घडली. खून करून मृतदेह घराच्या जमिनीखाली पुरण्यात आला आणि त्यावर टाइल्सही बसवण्यात आल्या. विशेष म्हणजे, या टाइल्स विजयच्या भावाकडून लावून घेण्यात आल्या, हे तपासात दिसत आहे. दरम्यान पंधरा दिवसानंतर या खुनाचा उलगडा झालेला आहे. भावाला संशय आल्याने अखेर केलेले पाप समोर आलेले आहे अधिक तपास मला सपोरा नालासोपारा पोलीस करत आहे.