देशव्यापी संप.कामगार कायद्याविरोधात गुरुवारी बँकांचा संप, ४ दिवस व्यवहार ठप्प
नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता.
कामगार कायद्याविरोधात गुरुवारी बँकांचा संप, ४ दिवस व्यवहार ठप्प
प्रतिनिधी
नाशिक
केंद्र सरकारने ५ कामगार कायदे बदलल्याने त्याला सेंट्रल ट्रेड युनियनने तीव्र विरोध करण्यासाठी गुरुवारी (दि. १२) देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. शहरातील १५०० कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. अधिकारी मात्र या संपात नसले तरी कामकाजासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्याने बँकांच्या कामावर परिणाम होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान तीनशे कोटींची उलाढाल ठप्प
होण्याची शक्यता आहे. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी
शनिवार-रविवार आल्याने कर्मचारी टाकणार सुटी
संप गुरूवारी आहे, शुक्रवारी कामकाज सुरू आहे, मात्र लागुनच दुसरा शनिवारची सुट्टी आणि रविवारची साप्ताहिक सुटी आहे. यामुळे अनेक कर्मचारी शुक्रवारी रजा टाकून सलग ४ दिवस बँकाचे कामकाज ठप्प होऊ शकते.
सरकारने अंमलात आणलेल्या श्रम संहिता कामगार संघटनांना कमजोर करण्याच्या हेतून असल्याचा संघटनांचा आरोप आहे. हे कामगार कायदे व कॉर्पोरेट धार्जिण्या श्रमसंहिता
कामांमध्ये रद्द करण्यात याव्यात, कंत्राटी, ट्रेनी, हंगामी, अप्रेंटीस, फिक्स टर्मच्या नावाखाली सुरू असलेले शोषण तातडीने थांबवा, बारमाही कायमस्वरूपी कंत्राटीकरणाला मज्जाव करा, असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र सर्व समावेशक कायदा करून सेवा शर्ती सामाजिक सुरक्षा लागू करा, ८ तासाच्या कामासाठी किमान वेतन ३० हजार रुपये लागू करा, सर्व ज्येष्ठांना दहा हजारांची मासिक पेन्शन लागू करा, बेरोजगारांना नोकऱ्या द्या नाहीतर जगण्या इतका भत्ता द्या अशा विविध मागण्यासाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.


