ब्रेकिंग

प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रचारांमध्ये आघाडी. मतदारांचा मिळतो मोठा प्रतिसाद.

नासिक जनमत  प्रतिनिधी प्रभाग क्रमांक एक मधील भाजपाचे उमेदवार 1)गीते दिपाली गणेश प्रभाग क्रमांक एक क.2) नन्नवरे रूपाली स्वप्निल प्रभाग 1 क्रमांक अ. 3) भानसी रंजना पोपटराव प्रभाग क्रमांक एक (ब )     4) पवार अरुण बाबुराव प्रभाग क्रमांक एक ड  या उमेदवारांनी प्रचारांमध्ये मोठी आघाडी घेतली असून प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे स्वागत करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी औक्षण करून आमचे मत कमळालाच असे मतदारान तर्फे उमेदवारांना सांगितल्या जात आहे

चारही उमेदवार सुशिक्षित व प्रभागाचा चांगला अभ्यास असल्याने प्रभागाचा विकास करणारे असल्याने मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. दिपाली गणेश गीते यांचे पती गणेश गीते हे प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत मागील पाच वर्षात त्यांनी प्रभागात विकासाची गंगा आणली आहे. प्रभागातील उद्याने नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी समृद्धी देणारे ठरत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्याची ट्रेनचे कामे या प्रभागात झालेले आहे. गणेश गीते हे स्टॅंडिंग सभापती व नगरसेवक नाशिक महानगरपालिकेचे राहिले असल्याने मोठ्या प्रमाणात प्रभागात त्यांनी विकास केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात सोडवले आहेत. चारी उमेदवार नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. आपला प्रभाग हेच आपले घर म्हणून प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नाशिक जन्मत जवळ बोलून दाखवले. संपूर्ण पॅनलला मोठा प्रतिसाद लाभत असून येणाऱ्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हा समोर बटन दाबून प्रभाग एक मधील सर्व उमेदवारांना नक्कीच निवडून देतील असे उमेदवारांनी बोलून दाखवले. निवडून आल्यानंतर

 

प्रभागात मोठे हॉस्पिटल आणणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. गणेश गीते यांनी नगरसेवक असताना याच भागात मोठे स्टेडियम  देखील आणले आहे. प्रभागाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असलेले हे उमेदवार असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले. त्यामुळे प्रभागात काही उमेदवार भाजपचेच असतील अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. प्रचाराच्या निघत असलेल्या रॅलीमध्ये हजारो महिला व नागरिक सहभागी होताना दिसतात. अनेक ज्येष्ठ नागरिक उमेदवारांना  विजयी भव असे आशीर्वाद देत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे