मालेगाव शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे हस्तगत

नाशिक जनमत मालेगाव शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे हस्तगत
नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार दिनांक २१/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आयशानगर पो.स्टे. हद्दीत रजमानपुरा अर्बन हेल्थ सेंटरच्या बाजुस मोकळ्या मैदानातून खालील दोन संशयितांना ताब्यात घेतले.
१) वसीम शेख इस्माईल, वय २८, रा. पायपंथळ चौक, हलीमा गार्डनजवळ, मालेगाव
२) मुशीर अली उर्फ अली शेख, वय २९, रा. जाफरनगर, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक
ताब्यात घेतलेल्या वरील दोन संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे मिळून आले. सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक अग्निशस्त्रे कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांचेविरुद्ध आयशानगर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७४/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेविरुद्ध यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरील प्रमाणे घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.


