भोर टाऊनशिप चार मुले बुडाली तिघांचे जीव वाचले. एकाचा मृत्यू.
नासिक जनमत सातपूर अंबड लिंक रोड वरील जाधव संकुल भोर टाऊनशिप या भागामध्ये काल दुपारी एक वाजेच्या सुमारास चार मुले घराकडे येत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये उतरली होती.
पाणी अंदाज न आल्याने ती मुले बुडू लागली याच वेळेस समोरच्या इमारतीमध्ये काही व्यक्ती या मुलांकडे बघत होत्या. त्या व्यक्तींनी धावपळ करत पाण्यात बुडत असलेल्या मुलांना बाहेर काढले व हॉस्पिटलमध्ये भरती केले. यातील तीन जणांची तब्येत बरी आहे. दरम्यान एक जण उपचार घेत होता त्याच प्रथम खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं नाकात तोंडात पाणी गेल्याने त्याची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली.
यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्याला वेलीटी नेटरवर ठेवण्यात आले होते रात्री त्याची प्राणज्योत मावळली. मयूर भोडवे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे भोरटाऊन परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने नाशिक मध्ये बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यांमध्ये बालकांनी खड्ड्यात उतरू नये असे पालकांनी सर्व विद्यार्थी व आपल्या पाल्यांना सांगावे. सध्या पाऊस चालू असल्याने या खड्ड्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे अशा घटना वाढू लागले आहेत. प्रवास विडी कामगार नगर मधील तीन बालकांचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. अशा घटना घडू नये यासाठी जनजागृती महत्त्वाची झाली आहे.