ब्रेकिंग

चांदवडचा टोल नाका बंद करावा. नासिक करांची मागणी.

नाशिककरांना 60 किलोमीटरसाठी दोन टोलनाके एका बाजूने भरावे लागतात चारशे दहा रुपये.

नासिक जनमत  चंद्रकांत धात्रक.   नासिक ते चांदवड 61 किलोमीटर अंतर आहे. दरम्यान नाशिककरांना चांदवड येथे जाण्यासाठी 61 किलोमीटरसाठी वाहनधारकांना दोन ठिकाणी टोल भरावा लागतो. पिंपळगाव बसवंत येथील नाशिक वरून तीस किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव टोल नाका येथे 240 रुपये टोल

भरावा लागतो. त्यानंतर शासनाच्या निर्णया नुसार प्रत्येक टोलनाक्यात 55 km अंतर हवे  परंतु तसे न होता. पुन्हा पुढे ३० किलोमीटर गेले की पुन्हा चांदवड टोल नाका येतो या ठिकाणी देखील 165 रुपये टोल भरावा लागत आहे. कार सारखे छोट्या वाहनास देखील  चारशे रुपये तोल भरावा लागत आहे. वाहन धारक  या नॅशनल हायवेच्या मनमानी कारभारावर प्रचंड नाराज असून. नितीन गडकरीं. सह स्थानिक नेते देखील हा सर्व प्रकार झोपेचं सोंग घेऊन नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना वर अन्याय करत आहे. खुलेआम जनतेची सरळ लूट चालवली आहे. अनेकांना कामानिमित्त चांदवड येथे जावे लागते. 61 किलोमीटर मध्ये दोनदा टोल भरावा लागतो येऊन जाऊन 810 इतका खर्च कारचालकाला टोल साठी लागत असून वाहनधारकांमध्ये संताप आहे. शेतकरी देखील नाशिक मार्केटला आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असून त्यांना देखील मोठा फटका आर्थिक बसत असून एक प्रकारे हा सर्वसामान्याला नॅशनल हायवे तर्फे झटका दिला जात आहे. स्थानिक नेत्यांनी नाशिककरांवर हा होणारा अन्याय बंद करावा. अनेक वर्षापासून चालू असलेला चांदवड चा टोल नाका बंद करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. अनेक भागातील नागरिकांनी दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून विलाज नसताना जुने वाहने घेतलेले आहेत. दरम्यान शासनातर्फे 61 किलोमीटर मध्ये दोनदा टोलनाके भर लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नेते या बातमीची दखल घेतील का. लवकरात लवकर चांदवडचा टोल नाका बंद करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. किंवा पिंपळगाव बसवंत टोल भरल्यानंतर पुढचा टोल नाका चांदवडला टोल लागू नये. अशी सोय नाशिककरांसाठी तरी करावी अशी मागणी नाशिककर करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे