ऐ न डी पटेल रोड वर भाजी विक्रीत्याला लुटले.
भाजीविक्रेत्याला तिघांनी लुटले
प्रतिनिधी |
नाशिक जनमत
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात या साठी कडक करावाई चालु आहें. तरी सुधा गुन्हेगार गुन्हे करताना दिसत आहें. काल भाजी विक्रेत्याला तीन संशयितांनी अडवत पैशांची मागणी करत ४ हजारांची लूट केल्याचा प्रकार एन. डी. पटेलरोडवर घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र गोतरणे (रा. पेठरोड) यांनी पोलिसांत तक्रार दिली. सायंकाळी ६.३० वाजता शालिमार येथे कपडे खरेदी करण्याकरता आले होते. एन. डी. पटेलरोडवर काम होते. लघुशंका करण्याकरता थांबले असता तीन
अनोळखी तरुणांनी अडवले. चाकूचा धाक दाखवून तुझ्याकडे किती पैसे आहे ते काढून दे. नाही तर आम्ही तुला मारून टाकू अशी धमकी देत पकडून पॅन्टच्या खिशातून ४ हजारांची रक्कम काढून घेतली. एकाने जोरात धक्का दिल्याने गोतरणे खाली पडले. कमरेला मुका मार लागल्याने संशयित पळून गेले. एकजण ‘यश घाऱ्या, पळा पळा’ असे ओरडल्याने नावे समजली. पोलिसांनी परिसरात शोध घेत संशयित शाकीर उर्फ घाऱ्या शेख याला अटक केली. पुढील अधिक तपास पोलिस करीत आहेत. कडक करावाई करण्याची मागणी नागरिक करीत आहें.