सातपूर पोलीस निरीक्षकाची पत्रकाराला मारहाण. पोलीस उपनिरीक्षकाला निलिबीत करण्याची पत्रकाराची मागणी .
सातपूर पोलिसांची ‘दबंगगिरी’; पत्रकाराला केली सराईत गुंडासारखी बेदम मारहाण
रात्रभर डांबून सकाळी सोडले, साध्या NC वर एवढ्या मोठ्या कारवाईवर संशय
नाशिक जन्मत सातपूर येथील पोलीस उपनिरीक्षकाने पत्रकारास गुडा सारखी मरहा ण केल्याची घटना घडली असून पत्रकार क्षेत्रात खळबळ झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकास ताबडतोब नीलिबीत करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. या घटनेचा प्रतिसाद संपूर्ण देशातील पत्रकारांमध्ये होत आहे. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर थर्ड डिग्री सारखा आन्याय करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक.व सातपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. शेजाऱ्या झालेले किरकोळ वादाचा
पोलिसांनी तोडगा न करता आर्थिक फायद्यातून पत्रकार यास मारहान झाल्याचे चर्चा सध्या नागरिक व पोलीस वर्तुळात आहे.
साध्या वादातून एका यूट्युब चॅनलच्या पत्रकाराला सातपूर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसताना, एका गुंडाप्रमाणे थर्ड डिग्रीचा वापर करून रात्रभर डांबून ठेवल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जाधव संकुल येथे राहणारे पत्रकार तुषार ढेपले यांचा त्यांच्या शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला होता. या वादाची माहिती ११२ क्रमांकावर दिल्यावर सातपूर पोलीस
ठाण्याचे पथक त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी तक्रारदारही तिथे हजर असल्याने त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागातून ठाणे अंमलदाराने ढेपले यांच्या श्रीमुखात भडकावून त्यांना आतल्या खोलीत नेले. तिथे एका उपनिरीक्षकासह इतर पोलिसांनी ‘आमच्या विरोधात बातम्या दाखवतो काय?’ असा जाब विचारत पट्ट्याने हाता-पायांवर बेदम मारहाण केली.
( पत्रकारांनी संघटित होऊन लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ बाबत अशा घटना घडू नये यासाठी. पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री. व राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्याची मागणी पत्रकारां सह नागरिकांमध्ये होत आहे.)
(पत्रकार विरुद्ध कोणतीही सह निशा न करता पत्रकार जाहिरात मारण्यासाठी गेला असला तरी देखील त्याच्यावर त्याच्यावर दमदाडी खंडणीची गुन्हे असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ बाबत घडू लागले आहे.)
रात्री २:३० वाजता कोणतीही कारवाई न करता ढेपले यांना सोडून देण्यात आले. पत्रकार
संघटनांनी या प्रकाराबद्दल जाब विचारल्यावर पोलिसांनी सारवासारव करत १२ तासांनंतर ढेपले यांना नोटीस बजावल्याचे समजते. पोलिसांनी केलेल्या या कृतीचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. पत्रकार संघटनांनी सोमवारी (दि. ८) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणातील मारहाण करणाऱ्या उपनिरीक्षकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असे कळते. दरम्यान सर्व पत्रकारांनी संघटित होऊन या घटनेचा तपास करून पत्रकाराला न्यायं द्यावा अशी मागणी सर्व पत्रकार संघटना करत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेला लेखी निवेदनाद्वारे आदेश देण्याची मागणी पत्रकार यांनी केली आहे. असे प्रकार पत्रकारान बाबत नेहमी नेहमी घडतं असून ते धाबवणे महत्वाची झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी काही पोलिसांच्या समोर घटना होत असेल पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असेल. आणि पत्रकार तो प्रकार टिपण्याचा प्रयत्न करत असेल तर. अशावेळी पत्रकारांना दम देण्याचा प्रकार देखील काही पत्रकारांच्या बाबतीत घडत आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी लक्ष घालून घटनेचा तपास करुन पत्रकारास नाय देण्याची मागणी पत्रकार वर्गाने केली आहे.