अखेर सातपूर जळीत घटनेतील तीन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू.
सातपूर जळीत घटनेतील तीन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिनिधी |
सातपूर प्रतिनिधी
– महादेववाडीत ८ ऑक्टोबरला झाडाच्या फांद्या छाटण्यासाठीच्या मशिनसाठी प्लास्टिक कॅनमध्ये आणलेल्या पेट्रोलचा भडका होऊन दोबाडे कुटुंबातील पाच व अन्य एक असे सहा जण गंभीर भाजले होते. – यातील जखमी कैलास दोबाडे (६०), पंकज कैलास दोबाडे (३०) व दुर्गा आकाश दोबाडे (२२) या तिघांचा रविवारी (दि.१२) मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोनी गाडेकर (३०) हिची प्रकृती चिंताजनक आहे.
महादेववाडीत येथे खोका मार्केटसमोर पिंपळ वृक्षाची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. यात लता
कैलास दोबाडे, कैलास दोबाडे, सोनाली राजेश गाडेकर, दुर्गा आकाश दोबाडे, भावेश आकाश दोबाडे यांच्यासह पंकज दोबाडे गंभीर भाजले होते. जखमींवर प्रारंभी जिल्हा रुग्णालय व नंतर मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवले होते