तपोवनत डेंटलच्या विद्यार्थ्यांना लुटले, संशयित टवाळखोर ताब्यात.
प्रतिनिधी नाशिक जन्मत नासिक मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण असून गुन्हेगारी वाढत आहे. दररोज लुटमार अपहरण खून घरपोडी गोळीबार खंडणी इत्यादी प्रकारच्या घटना घडत आहे. दहशत निर्माण करून गाड्या फोडणे असे प्रकार नाशिककरांसाठी नेहमीचे झालेले आहे. लवकरच कुंभमेळा येणार असून नाशिकला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात नाशिककर सुरक्षित नाही तर पर्यटक कसे असतील असा प्रश्न नाशिककरांना पडत आहे परवा नाशिकच्या
तपोवनात परिसरातील रामसृष्टी उद्यानात फिरण्यास आलेल्या डेंटल कॉलेजच्या तीन विद्यार्थिनी आणि एका मित्राला चार टवाळखोरांनी डोळ्यावर फ्लॅश लाइट चमकवत लुटल्याचा प्रकार रविवारी रात्री ८ वाजता घडला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयितांचा शोध घेत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने ३ मैत्रिणी आणि १ मित्र रात्री ८ वाजता रामसृष्टी उद्यानात फिरत असताना चार टवाळखोरांनी त्यांच्यावर फ्लॅश लाइट चमकवत पैशांची मागणी केली. तरुणाने फ्लॅश लाइट बंद करा असे सांगितले. याचा राग आल्याने संशयितांनी तरुणाला बेदम मारहाण केली.. त्याला सोडविण्यास गेलेल्या दोन तरुणींना शिवीगाळ केली. एका तरुणीने हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने मोबाइल खेचून घेतला. मोबाइल परत मागितला असता संशयिताने ५०० रुपये मागितले. पैसे दिल्यानंतरही मोबाइल न देता पलायन केले. तरुणीने पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहें
दरम्यान पोलीस वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाने तरुणींनी सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे संशयितांचा माग काढत तपोवन परिसरात त्यांना ताब्यात घेतले. आदित्य गवळी (२३), गणेश भांगरे (१८), भगीरथ पवार (१९) व अमोल माळी (१८) अशी संशयितांची नावे आहे. त्यांच्याकडील मोबाइल आणि रक्कम जप्त केली.
संशयितांनी तरुणींच्या हातात बळजबरीने मद्याची बाटली हातात देत व्हिडिओ काढत एका संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे डेंटल कॉलेजचे विद्यार्थी भयबीत झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.