सातपूरला 3 घरफोड्या, १७ लाखांचा ऐवज चोरी.
प्रतिनिधी |
सातपूर
नाशिक जन्मत नाशिक शहरामध्ये चोरीचे सत्र चालूच असून काल एका दिवसात तीन ठिकाणी सातपूर मध्ये घरफोडी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सातपूर कॉलनी व कामगारनगर परिसरात चोरट्याने तीन ठिकाणी बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडत घरातील १७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
कामगारनगरला दोन ठिकाणी सोमवारी मध्यरात्री घरफोडी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमारसिंग मगनसिंग परदेशी हे दिनांक २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान बाहेरगावी गेले होते. चोरट्याने कडीकोयंडा तोडत घरात प्रवेश करत हॉलमधील कपाटाचे लॉक तोडत निवृत्त पेन्शन फंडाचे ४ लाख २१ हजार, शेती व्यवसायात मिळालेले ६ लाख ४८ हजार, घर, गाळेभाड्यात मिळालेले २ लाख ४६ हजार, आई,
-. व
वडील यांच्या हिश्श्यामध्ये मिळालेले दागदागिने ३ लाख ६० हजार असा १६ लाख ७५ रोख रक्कम चोरून नेली आहेत. याप्रकरणी कुमारसिंग मगनसिंग परदेशी यांच्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत मध्यरात्री चोरट्यांनी नितीन गोडसे यांचे बंद घराचा कडी तोडत सोन्याचे दागिन्यांसह ७० हजार रक्कम चोरून नेली. तिसऱ्या घटनेत खासगी क्लासच्या ठिकाणी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्याला रिकाम्या हाती जावे लागले आहे. संशयित सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल नळकांडे करत आहेत.