सातपूर मध्ये रात्री दीड वाजता अपघात. दोन मित्र ठार. अपघाताची माहिती मिळेना.
प्रतिनिधी | नाशिक जन्मत
रस्त्यातील खड्डे नाशिककरांसाठी धोकेदायक ठरत असून आम्ही त्यांना आपले प्राण गमावे लागले आहे.. पंचवटी देखील रिटायर शिक्षकाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला होता. दरम्यान सात पूर कॉलनीच्या श्रीराम चौकात गुरुवारी (दि. ९) रात्री दीड वाजता झालेल्या अपघातात महादेववाडीतील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सातपूर पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, सुनील गांगुर्डे (३२) आणि लखन खरे (३५) हे दोघेही महादेववाडी, महालक्ष्मी चौक भागातील रहिवासी होते. ते दुचाकीवरून (एमएच १५ डीव्ही ७७३२) जात असताना श्रीराम चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात कसा झाला, कशामुळे झाला याची अपघातस्थळासह परिसरात कोणालाच काहीही माहिती नाही. त्यामुळे दिवसभर पोलिस अपघात कसा झाला याचा शोध घेत होते. मात्र माहिती मिळाली नाही. अपघातातील दोघांनाही गंभीर दुखापत झाली. ते रस्त्यावर बेशुद्ध पडलेले होते.
- पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले. नातेवाइकांना ही घटना समजताच त्यांनी रुग्णालयात गर्दी करत आक्रोश केला होता. या घटनेने महादेववाडी परिसरात आणि गांगुर्डे व खरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात ठार झालेला सुनील गांगुर्डे हा बीएसपी नेता अरुण काळे यांचा भाचा होता. हवालदार आबाजी मुसळे हे या अपघाताचा पुढील तपास करत असून घटनेची नोंद सातपूर पोलिस ठाण्यात कर”ण्यात आली आहे. या अपघातामुळे माहदेव वाडी परिसरावर सोकळा पसरली आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे रस्त्यावरील खड्डे ताबडतोब योजना द्यावी अशी मागणी नाशिककर यांनी केली आहे.