नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम;* *नगरपरिषद निहाय निवडणूक निरीक्षक नियुक्त*
*नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम;*
*नगरपरिषद निहाय निवडणूक निरीक्षक नियुक्त*
*नाशिक, दि. 24 नोव्हेंबर, 2025 (
वृत्तसेवा):* राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या सार्वत्रिक निवडणूकांसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून निवडणूक निरिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन, सह आयुक्त शाम गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
असे आहेत नगरपरिषद निहाय नियुक्त निवडणूक निरीक्षक
1. येवला व मनमाड नगरपरिषदेसाठी भागवत गोविंद गावंडे, उपायुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 8691956111 असा आहे.
2. सिन्नर, ओझर व पिंपळगाव बसंवत नगरपरिषदेसाठी बाळासाहेब बापूसाहेब कोळेकर, अपर जिल्हाधिकारी, शिर्डी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 8108533352 असा आहे.
3. इगतपुरी, त्रिंबक व भगूर नगरपरिषदेसाठी अजय मोरे, अपर विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 7020252072 असा आहे.
4. नांदगाव, सटाणा व चांदवड नगरपरिषदेसाठी रेश्मा माळी, अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती, अहिल्यानगर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक झाली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9011022656 असा आहे.
जाहिरात व बातमी साठी संपर्क 9273020944. 9834767771.
नागरीकांनी निवडणूक संदर्भात काही अडचणी/ तक्रार असल्यास नियुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही आवाहन सह आयुक्त श्री गोसावी यांनी केले आहे.