बुधवारी रात्री नातीचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या नातेवाईकांवर काळाचा घाला. सात ठार.
समोर दुचाकी.ब्रेक खाली एक्सलेटर आल्याने कारचा ताबा सुटला.
नाशिक जन् मत आनंदाचे क्षण साजरे करून. व रात्री मुक्कामाचा आग्रह असताना. काळाने घाई केली. आणि अपघाताला समोर जावे लागले . अशी दुर्दैवी घटना बुधवारी रात्री अकरा वाजता घडली. या घटनेने संपूर्ण दिंडोरी. सह नाशिक जिल्हा हदरून गेला आहे.नातीचा पहिला वाढदिवस साजरा करुन नाशिकहून परतताना दिंडोरी- वणी रस्त्यावर आजी-आजोबा, मावशी-काका, २ वर्षाच्या मावसभावासह आणखी एक दाम्पत्य असे ७ जण ठार झाले. बालाजी नर्सरीजवळ बुधवारी रात्री साडेअकराला दुचाकीने धडक दिल्यानंतर कार अनियंत्रित होऊन नाल्यात कोसळून गुदमरुन कारमधील सर्वांचा मृत्यू झाला.
नात प्रांजल प्रशांत शेलार हिच्या वाढदिवसानिमित्त मखमलाबाद येथून परतताना नियतीने तीन कुटंबांना हिरावले. उत्तम एकनाथ जाधव (४२), अलका उत्तम जाधव (३८, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी), देवीदास पंडित गांगुर्डे (२८), मनीषा देवीदास गांगुर्डे (२३), भावेश देवीदास गांगुर्डे (२, रा. सारसाळे, दिंडोरी), दत्तात्रय नामदेव वाघमारे (४५), अनुसया दत्तात्रय वाघमारे (४०, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मंगेश कुरघडे (२५), अजय गोंद (१८, रा. नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर, सध्या सातपूर) हे जखमी झाले. अल्टो कार पाण्यात पडली. यावेळेस सर्व दरवाजे लॉक झाल्याने पाण्यामध्ये गुदमरून मृत्यू झाला. अर्ध्या तासाने क्रेन आल्यानंतर गाडी चारीतून बाहेर काढण्यात आली. दुचाकी जोरात कारवर आदळल्याने कारचे टायर फुटले आणि कार 9 फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपास दिंडोरी पोलीस करत आहे