मखमलाबाद रोडवर चेन स्कॅनिंग चे प्रकार वाढले. अर्ध्या तासात लाखाची सोने गायब.

प्रतिनिधी | नाशिक जन्मत हिरावाडी ते मखमलाबाद रोड या परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यातच आता सोनसाखळी चोरांनी दोन-तीन महिन्यापासून उषांत मांडला आहे. मागील दोन-तीन महिन्यात ती साखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचे पूर्ण वृत्ती काल पुन्हा आली आहे
पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड आणि हिरावाडी परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. रात्री ९. आणि ९:30 या कालावधीत पाठोपाठ दोन घटना घडल्या. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि उषा पवार (रा. नवनिर्माण चौक मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ९ वाजता पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या मोपेड वरील दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने गळ्यावर मारत ३५ हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. ही घटनेची
तक्रार दाखल होत नाही तोच सविता पाटील (रा. साई मुरली बंगला हिरावाडी बोडके लेन नंबर ३) येथे शतपावली करत असताना संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ६५ हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. पाठोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे महादेव बाग . महादेव कॉलनी वडजाई माता नगर या परिसरात पोलीस चौकीची मागणी नागरी करत आहे . पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढावी . अशा घटना थांबाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.