दारू पिऊन मारामारी करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाचा मृत्यू .
सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील घटना.
- मध्य पिऊन मारामारी करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाचा मृत्यू
प्रतिनिधी |
नाशिक जनमत प्रतिनिधी सिडको मागील दहा दिवसांपूर्वी माऊली लॉन्स या परिसरामध्ये प्रशांत भदाणे याचा किरकोळ कारणातून खून झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल त्रिमूर्ती चौकातील
दत्त मंदिर बस स्टॉपजवळील दारू दुकानासमोरच दारूच्या नशेतील दोघांमध्ये वाद झाला.
त्यातील एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडुक्याने प्रहार करून खून केला. अंबड पोलिसांनी मद्यपी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.
त्रिमूर्ती चौकातील पोलिस चौकीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर भरदिवसा वर्दळ असताना ही घटना घडल्याने अंबड पोलिसांवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंटवाडीतील गणपत घारे (५०) आणि त्यांच्यासोबतचा संशयित समोद कौर (३५) हे दोघेही दारू दुकानाबाहेरच दारू पित होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात घारे यांनी कौरला धक्का दिल्याने कौरने जवळच पडलेला लाकडी दांडका घारे यांच्या डोक्यावर मारल्याने घारे जागीच कोसळले. त्यानंतरही कौरने चार वार केल्याने घारे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन कौर यास अटक केली. दोघेही दारूच्या नशेत भांडले आणि त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान खून झाल्यानंतरही संध्याकाळी दारू दुकानावर जुनी यात्रा भरली असे चित्र होते. अशा घटना थांबवण्यासाठी या भागात पोलीसग्रस्त व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे झाले आहे. सरकारला दारू उत्पादनातून मोठ्या महसूल मिळत असल्याने सरकारने आता दारूच्या दुकाना परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवावा. अशी मागणी नागरिक करत आहे.