दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल बाळासाहेब घुगें नि केला वापस. प्रामाणिकपणा. मोबाईल मूळ मालकाला परत.
बाळासाहेब घुगेंचा प्रामाणिकपणा
हरवलेला महागडा मोबाईल मूळ मालकाला परत
सिडको : विशेष प्रतिनिधी आज काल पैशाच्या मागे धावणाऱ्या युगामध्ये एक अपंग व्यक्ती आपल्याला सापडलेला दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल वापस करतो ही खूप मोठी गोष्ट आहे. दीड लाख रुपयाचा मोबाईल सापडणे म्हणजे जणू एखाद्याला लॉटरी लागली. असा आनंद त्या माणसाला होतो. परंतु सिडकोतील बाळासाहेब घुगे यांनी तो मोबाईल पोलीस स्टेशनमध्ये वापस देऊन मूळ मालकाला परत केला. यामुळे बाळासाहेब घुगे यांचे सर्व थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे
रिक्षामध्ये सापडलेला एक लाख ५० हजार रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल फोन अंबड पोलीस स्टेशनमध्ये जमा करत दिव्यांग प्रवासी बाळासाहेब घुगे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नागरिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड आणि सिडको परिसरात जनजागृती केली जात होती.
या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम म्हणून,
दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी स्वामी विवेकानंदनगर, सिडको येथील रहिवासी बाळासाहेब घुगे राणेनगर ते महामार्ग बसस्थानक रिक्षातून प्रवास करत असताना त्यांना मोबाईल रिक्षात मिळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क साधला. रिक्षात मिळून आलेला मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ मोबाईलच्या मूळ मालकाला संपर्क करून तो मोबाईल मूळ मालक राजेश सोनी (रा. सोमवार पेठ, नाशिक) यांना परत दिला.
हरवलेला महागडा मोबाइल परत मिळाल्याने मोबाईल मालक राजेश सोनी यांनी अंबड पोलिसांसह बाळासाहेब घुगे यांचे आभार मानले. याबद्दल घुगे यांचे कौतुक होत आहे. नासिक जनमत तर्फे बाळासाहेब घुगे यांचे खूप खूप अभिनंदन.