बाळासाहेब सोनवणे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार.
*बाळासाहेब सोनवणे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार*🌹💐💐
*नाशिक- जनमत
*आज ‘आपली आपुलकी’ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भारत सेवाश्रम संघ,तपोवन,नाशिक या ठिकाणी निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष,डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन चे नाशिक जिल्हा समन्वयक,तसेच गंगापूर येथील दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु.कॉलेजचे उपशिक्षक बाळासाहेब दादा सोनवणे यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.*
*यावेळी पुरस्कार वितरित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ,मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे समवेत श्री राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सेवक,दैनिक गावकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत,आपुलकी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे.यावेळी सत्कारार्थी ह भ प भरत वाघमहाराज (शिवडा),टीडीएफचे कोषाध्यक्ष व व गंगापूरचे क्रीडाशिक्षक हेमंत पाटील,व्ही.एन्. नाईक शिक्षण संस्थेचे लांडगेसर,आपुलकी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, उपाध्यक्ष जयवंत राऊत, सचिव शांताराम गायकवाड, सहसचिव रामदास शिंदे, बळीराम माचरेकर दादा गायकवाड,कविता डावरे आदी उपस्थित होते.*
*फोटो कॅप्शन -* गंगापूर येथील दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु.कॉलेजचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ समवेत मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सेवक,आपुलकीचे अध्यक्ष अशोक डावरे,ह.भ.प.भरत वाघ इ.