विभागीय आयुक्तांनी घेतला विधान परिषद निवडणुकीचा आढावा*
दि.९ जानेवारी,२०२३
*विभागीय आयुक्तांनी घेतला विधान परिषद निवडणुकीचा आढावा*
*नाशिक,दि.०९ जानेवारी, २०२३(विमाका वृत्तसेवा)*
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी रोजी होणार आहे. मतदान प्रकिया सुरळीत होण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पूर्व तयारी आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी नाशिक गंगाधरण.डी., जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, उपायुक्त (महसूल)संजय काटकर, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, उपायुक्त (रोहयो) प्रज्ञा बडे- मिसाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.
दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, उपजिल्हाधिकारी धुळे अंतुरलीकर, जळगावचे तुकाराम हुलावळे उपस्थित होते.
श्री गमे यांनी यावेळी मतपेट्यांची उपलब्धता, मतपत्रिका छपाई याचा आढावा घेतला. तसेच निवडणूक काळातील वाहनाबाबतचे नियोजन, सूक्ष्म निरीक्षक नियुक्त्या, तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेबाबत नियोजन,या बाबतचा आढावा त्यांनी घेतला. निवडणुक काळात सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
0000000000