ब्रेकिंग
पदवीधर मतदार संघ:* *तीन नामनिर्देशन अर्ज दाखल*
*पदवीधर मतदार संघ:*
*तीन नामनिर्देशन अर्ज दाखल*
*नाशिक, दि.10 जानेवारी,2023 (विमाका वृत्तसेवा)*
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि.10 जानेवारी,2023 रोजी तीन नामनिर्देशन अर्ज झालेले आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.
आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये शुभांगी भास्कर पाटील, धुळे, ॲड. जुबेर नसीर शेख,धुळे व सोमनाथ नाना गायकवाड, नाशिक या तिन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनाची मुदत 12 जानेवारी, 2023 पर्यंत आहे.