प्रचार रॅलीमध्ये शांतिगिरी महाराज. व हेमंत गोडसे समोरासमोर शांतिगिरी महाराजांनी दिले नारळ.
नाशिक जनमत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रचार रॅली काल सिन्नरमध्ये चालू असताना समोरून लोकसभेचे अपक्ष उमेदवार महंत शांतिगिरी महाराज यांची देखील प्रचार रॅली समोरासमोर आली यावेळी प्रचार रॅली मधील शांतिगिरी महाराजांचे कार्यकर्ते व हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते देखील समारं समोर आले. मोठ्या प्रमाणात ऊन असले तरी प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात हेमंत गोडसे व शांतिगिरी महाराज यांच्या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते दहा दिवसावर
मतदान आल असून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू झाला आहे. दोघेही लोकसभेचे उमेदवार समोरासमोर आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी बाबाजी शांतिगिरी महाराज यांच्याकडे जाऊन दर्शन घेतले. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी पुढे येत हेमंत गोडसे यांना नारळ दिले . यावरून राजकारणात कोणी कोणाचे शत्रू नसून मित्र असल्याचे दिसून आले. तसेच दबकया आवाजामध्ये पुढे जाऊन काही पाठिंबा देण्याच्या चर्चा देखील ऐकण्यात मिळाल्या असून ऐनवेळी काही अपक्ष उमेदवार हेमंत गोडसेंना पाठिंबा देऊ शकतील अशा चर्चा सूत्रांच्या हवाले नाशिक जनमत कडे येत आहे. येणाऱ्या सात आठ दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल. मोठ्या प्रमाणात बाबाजींच्या विजयासाठी भक्तगण घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचे दिसून आले. तर हेमंत गोडसे यांच्या देखील प्रचाराने विविध भागात जोर धरला आहे. नासिक मतदारसंघात तीहिरी लढत होत असून. माजी आमदार राजाभाऊ वाजे हेदेखील प्रचार मध्ये आघाडीवर आहे. आपापल्या परिसरातील व नातेवाईकातील गुरु शिष्य परिवारातील नागरिक मतदार आपल्या आपल्या जवळील उमेदवारांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.