ब्रेकिंग

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील ) नाशिकचे पूना क्लब वर आघाडीचे गुण

 

 

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील )

 

नाशिकचे पूना क्लब वर आघाडीचे गुण

 

साहिल पारखच्या फटकेबाज १३२

 

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , नाशिकने पूना क्लबवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले.

नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना पूना क्लबने ९० षटकांत सर्वबाद २८० धावा केल्या. नाशिकच्या समकीत सुराणा, व्यंकटेश बेहरे , विवेक यादव व कृष्णा केदारने प्रत्येकी २ तर साहिल पारखने १ बळी घेतला. उत्तरादाखल नाशिकच्या कर्णधार साहिल पारखने केवळ ७० चेंडूत १४ चौकार व ९ षटकरांसह तडाखेबंद १३२ धावा केल्या. त्यास आर्यन पालकरने उत्तम साथ देत ४४ चेंडूत ७१ धावा फटकवल्याने नाशिकने केवळ १४.३ षटकांत १४५ धावांची

सलामीची भागीदारी केली. प्रसाद दिंडेने ४२ धावा केल्या व नाशिक संघाने केवळ ३८ व्या षटकांतच २८१ धावा करत पूना क्लबवर आघाडी घेतली व पहिल्या डावात ४४.१ षटकांत सर्वबाद २९७ धावा केल्या. सामना अनिर्णित अवस्थेत संपेपर्यंत पूना क्लबने दुसऱ्या डावात १ बाद २५ धावा केल्या. नाशिकने पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे