ब्रेकिंग

मखमलाबाद परिसरातील महादेव कॉलनी परिसरात रस्त्याची चाळण. पावसाच्या अगोदर रस्ते रिपेर करण्याची मागणी

नाशिक जनमत प्रतिनिधी. मखमलाबाद रोड वरील  महादेव कॉलनी वडजाई माता नगर  या भागामध्ये अजूनही रस्त्याचे डांबरीकरण किंवा खडीकरण नसल्याने पावसाळ्यामध्ये वाहनधारक विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो.

 

 

पुढील महिन्यांमध्ये पावसाळा चालू होत असून या भागातील रस्ते खडीकरण किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरते.

 

या भागातील नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना या रस्त्याने पायी चालणे देखील अवघड होते. अनेक विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी जाताना रस्त्यातच त्यांचे कपडे चिखलाने खराब होतात त्यामुळे शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागते.

या भागातून वाहन चालवणे त्रासदायक झालेले आहे. सर्वत्र खड्डे भरलेले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी भरले जाते खड्ड्याचा अंदाज न आल्याने लहान-मोठे अपघात होतात. हा भाग नव्याने विकसित होणारा भाग असून मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी या भागात राहतात महानगरपालिकेची सर्व टॅक्स सर्व जनता या भागातील भरत असतात. परंतु नाशिक शहरातील नागरिकांप्रमाणे या भागातील नागरिकांना रस्ता पाणी वीज या सुविधा व्यवस्थित महानगरपालिकेतर्फे पुरवल्या जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या अगोदर या भागातील गल्ली रस्ते डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केले आहे. लोकप्रतिनिधी आणि आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी या भागाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. लवकरात लवकर रस्ते रिपेअर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे