
45 वर्षी व्यक्तीची सातपूर मध्ये हत्या. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले.
नाशिक जन्मत(प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खून झाले आहेत. तसेच घरफोड्या होऊन हाणामारी चेन स्कॅनिंग. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलिसांची निष्क्रियता नाशिक शहरात दिसत असून नागरिकांचा विश्वास पोलिसांवरून उडत असल्याचे चित्र आहे. काल सातपूर मध्ये मध्यरात्री 45 वर्षे व्यक्तीचा खून झाल्याची चर्चा चालू आहे.
नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असतांना सातपूरमधील प्रबुद्ध नगर परिसरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्री खून करण्यात आला. दरम्यान काल सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह काही नागरिकांनी पाहिला आणि याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.