रुग्णाचा मृत्यू: नातेवाइकांचा मेडिकल कॉलेजमध्ये गोंधळ
रुग्णाचा मृत्यू: नातेवाइकांचा मेडिकल कॉलेजमध्ये गोंधळ
प्रतिनिधी | नाशिक जन्मत
अपघातग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाइकांना रुग्णालयातील डॉक्टरांनी जाब विचारत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाइकांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी, नुकसान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि डॉ. कल्पना देवनेसह अधिष्ठाता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पांगरी येथील तुषार दिलीप शिंदे
यांचा १६ एप्रिलला अपघात झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दि. २८ एप्रिलला त्यांना गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटरवर डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, आडगाव येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दि. २ मे रोजी सायंकाळी ५.३५ वाजता मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाइकांनी गोंधळ घातला. संशयित दत्तात्रय कोकाटे, बाळू शिंदे, विकास शिंदे, दिलीप शिंदे व दोन महिलांसह तीन ते चार नातेवाइकांनी डॉक्टर, कर्मचारी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. रुग्णालयाची तोडफोड केली. वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार तपास करत आहे.