पावसामुळे दुचाकी स्लीप, टेम्पोखाली सापडून युवती ठार
नाशिक जनमत गेल्या दोन-चार दिवसापासून रिमझिम पाऊस नाशिक मध्ये चालू आहे त्यामुळे रस्त्यावर चिडचिड झालेले आहे. काल वेगात जाणारी दुचाकी पावसाच्या पाण्यात स्लीप झाल्याने खाली पडलेल्या युवतीच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने युवती ठार झाली.
रविवारी (दि. २४) सायंकाळी ४:३० वाजता गंगापूर गावाकडून सातपूरकडे येत असताना बारदान फाटा चौफुलीवर हा अपघात घडला. माही
मनीष शर्मा (१८) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला माही शर्मा आहे. पोलिस अमलदार कमलाकर मोरे यांच्या तक्रारीनुसार, नीलेश
शिवाजी पाटील हा युवक दुचाकीवरून (एमएच १५ केबी ५५६६) माही शर्मा (१८) हिच्यासोबत गंगापूर गावाकडून सातपूरकडे भरधाव येत असताना बारदान फाटा येथे सिग्नलवर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत असताना पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी स्लीप झाली. दोघेही रस्त्यावर
उजव्या बाजूला फेकले गेले. याचवेळी जनरेटर वाहतूक करणारा टेम्पो (एमएच १५ डीएल ०७३५) रस्त्यावर पडलेल्या माही शर्मा हिच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यात ती जागीच ठार झाली. नीलेश पाटील गंभीर जखमी झाला. पोलिस तपास करत आहे.