मखमलाबाद रस्ता खड्ड्यात. लहान असलेली खड्डे झाली मोठी. वाहन चालकांना मन संताप मनस्ताप.
मखमला बाद परिसरातील कॉलनी रस्ते गेले खड्ड्यात
नासिक जनमत प्रतिनिधी चालू असलेल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांतीनगर ते मख मला बाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडलेले आहेत. पाटाच्या पुढे महादेव कॉलनी पुढे मोठ्या प्रमाणात खड्ड्यात खड्डे आहे. मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या परिसरामध्ये
लाखो नागरिक राहत आहेत. महानगरपालिकेचे सर्व टॅक्स सर्व नागरिक भरत असून त्यांना चांगले सुविधा मिळत नाही. कॉलनी रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. डांबरीकरणाची आवश्यकता आहे. अनेक भागांमध्ये पिण्याचे पाणी कमी प्रमाणात येते. या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकने महत्त्वाचे आहे.
मखमलाबाद कडे जात असताना दररोज रस्त्यावर अनेक मोटर सायकल स्लीप होऊन अनेक अपघात होत आहे. कामानिमित्त नाशिक शहराकडे येताना नागरिकांना रस्त्यावर चालणे. तसेच दुचाकी चार चाकी चालवणे कठीण झालेले आहे. महानगरपालिकेने दहा दिवसांपूर्वी बुजवलेले सर्व खड्डे पुन्हा मोठे मोठे खड्डे झालेले आहेत. ठेकेदार व अधिकारी चांगल्या पद्धतीने खड्डे बुज वत नसल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्ड्याचे प्रमाण वाढले आहे. थोडा जरी पाऊस आला तर ही खड्डे पाण्याने भरतात. खड्ड्याचा अंदाज पाण्यामुळे येत नाही. यामुळे नागरिक खड्यात पडतात. दुचाकी चार चाकी यांचा मेंटेनेस खड्ड्यांमुळे वाढला आहे. अनेक वाहने नादुरुस्त होत आहे. महादेव कॉलनी वडजाई माता नगर
मखमलाबाद गाव परिसरातील नागरिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागावर नाराज झाले असून कॉलनी रस्ते व रहदारीचे कॉंक्रिटीकरण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केले आहे.