‘माझा भाऊ गेला, मला न्याय द्या… माझा भाऊ तर आता येणार नाही… मला न्याय द्या…
नाशिक जन्मत रक्षाबंधनच्या रात्री वडनेर दुमला येथे बिबट्याने तीन वर्षे बाळाला ठार मारले होते. यामुळे वडनेर पाथर्डी परिसरामध्ये पसरलेली आहे. बिबट्यांचे
दररोज या परिसरामध्ये दर्शन होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असल्याने शेती काम कसे करायचे. तसेच मुलांनी शाळेत जायचे कसे. पुन्हा आयुष्य सारखी घटना झाली तर अशी असंख्य प्रश्न सध्या वडनेर दुमला व पाथर्डी भागातील रहिवाशांना पडला आहे. घटनाहून बारा दिवस
दिवस झाले तरी अजूनही वन विभागाने बिबट्याला पकडले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काल वडनेर दुमला पाथर्डी भागातील नागरिकांनी भर पावसामध्ये वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी आक्रोश करणारी आयुषची चिमुकल बहीण जेव्हा कळवळत होती तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्य होत्या. ‘माझं तर लेकरू गेलं… आता दुसर कोनाचं जाऊ नई’ असे हुंदके देणारे आयुषच्या आईचे शब्द अनेकांचे हृदय पिळवटून काढत होते. राखीपौर्णिमेच्या आदल्या संध्याकाळी वडनेर येथील घराच्या अंगणातून तीन वर्षांच्या आयुषला बिबट्याने उचलून नेत मारले. त्याला बुधवारी (दि. २०) १३ दिवस झाले तरी बिबट्याला पकडण्यात वनविभाग कुचकामी ठरल्याने वडनेरसह पंचक्रोशीतील नागरिकांनी भरपावसात मोर्चा काढून न्याय मागितला. सात दिवसांत बिबट्याला पकडले नाही तर वनमंत्र्यांनाच पिंजऱ्यात टाकण्याचा इशारा दिला.
वडनेरला ८ ऑगस्टला सायंकाळी
बिबट्याने आयुष किरण भगत या तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला. संतप्त नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागातर्फे या परिसरात २० – पिंजरे लावण्यात आले. मात्र बिबट्या पकडला न गेल्याने नागरिकांनी केशव पोरजे यांच्या नेतृत्वात वनविभागावर मोर्चा काढला. यावेळी वनविभागाचे अधिकारी मल्लिकार्जुन यांच्यासह पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांना आयुषच्या नातलगांनी निवेदन दिले. मोर्चात ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली. संभाजी चौक येथील वनविभागातील कार्यालयाच्या आवारात आयुषला श्रद्धांजली अर्पण करीत सात दिवसांचा अल्टिमेटम देत मोर्चा स्थगित कला. या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे वसंत ते, दत्ता गायकवाड़, योगेश गाडेकर, मनसेचे देश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात नातेवाईक महिला नागरिक मोर्चामध्ये सहभागी होते.