क्रेडीई नमः प्रॉपर्टी एक्सपो मध्ये शंभर कोटीची उलाढाल. समारोप रिअल इस्टेट मध्ये उत्साह.
75 फ्लॅटची बुकिंग. दिवाळीपर्यंत पाचशे कोटीचे उलाढाल होणार
नाशिक शहराचे असलेले चांगले वातावरण यामुळे मुंबई नाशिक पुणे इत्यादी शहरातील व राज्यातील व्यवसायिक नागरिक नाशिककडे वळू लागले आहे.शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या क्रेडाईच्या ‘नमः प्रॉपर्टी एक्स्पो’मध्ये ७५ फ्लॅटस्चे बुकिंग झाले असून किमान १०० कोटींची उलाढाल झाली. दिवाळीपर्यंत शहराच्या रिअल इस्टेटमध्ये २५० पेक्षा अधिक फ्लॅट्सच्या विक्रीतून ५०० कोटींची उलाढाल होण्याचा क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रदर्शनात १५ लाखांपासून १२.५१ कोटींचे फ्लॅट्स प्रदर्शित करण्यात आले होते. या साडेबारा कोटींच्या तीन फ्लॅट्सची विक्री झाली असून नाशिककरांनीच ते खरेदी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ४ दिवसांत येथे ३१ हजारावर नाशिककरांनी भेट देत विविध साइटची माहिती घेतली. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत फ्लॅटस्, पेंट हाऊसेस, ऑफिस आणि कमर्शियल स्पेसेस, रोहाउसेस, बंगलोज, फार्म हाउस, प्लॉटस् यांसारख्या पर्यायांमध्ये ५०० कोटींपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रदर्शनाचा सोमवारी (दि. १८) शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी ‘म्हाडा’चे अध्यक्ष रंजन ठाकरे, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, माजी अध्यक्ष कृणाल पाटील आदी मान्यवर होते. दादा भुसे यांनी सांगितले की निसर्गाने नाशिकला भरभरून दिलेले आहे नाशिकची ओळख लवकरच एज्युकेशन हब अशी होणार आहे त्यासाठी आपण प्रयत्न करावे शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की दोन वर्षात येणारा कुंभमेळा व क्रीडाई नमः प्रॉपर्टी एक्स पो नागरिकांसाठी ग्रह स्फूर्तीची सुरुवात झाल्याचे ते बोलले. येणाऱ्या पुढील तीन महिन्यांमध्ये अडीचशे फ्लॅट विक्री होतील असा अंदाज यावेळेस व्यक्त करण्यात आला. टू बीएचके
वरून थ्री बीएचके कडे नागरिक घर खरेदी कडे वळू लागले आहेत. मोठा प्रतिसाद क्रेडई नमः प्रॉपर्टी एक्सपोला मिळाला आहे.