ब्रेकिंग

सिन्नर जवळ शिवशाही बस जळून खाक. 43 प्रवाशी चा वाचला जीव.

नाशिक जनमत. नासिक पुणे महामार्गावर शॉर्ट सर्किट होऊन  शिवशाही बसला आग लागून ती  जलून खाक झाली. दुर्घटना बुधवारी सकाळी घडली चालकाच्या हुशारीमुळे बसमधील सर्व प्रवा सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने प्राण हानी झाली नाही. दरम्यान तीन दिवसांमधील ही तीसरी घटना आहे. पिंपरी चिंचवड आगाराची शिवशाही बस एम एच 06 बी डब्ल्यू 0640 नासिक सीबस सकाळी सात वाजता निघाली होती .व ती पुणे येथे जात होती सिन्नर येथील माळवाडी शिवारात बस आल्यानंतर तिची गती आपोआप कमी झाली. यावेळेस चालक अमित वासुदेव खेडकर यांच्या निदर्शनास आले की हळूहळू बस रस्त्याच्या डाव्या बाजूला त्यांनी घेतली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकाने पाठीमागून बस पेट ल्याचे बस चालक खेडकर यांना सांगितले यावेळी त्यांनी ताबडतोब बस उभी करत कंडक्टर आणि प्रवाशांना सावध करत लागलीच बस मधून खाली उतरण्याचे सांगितले बसमधील फायर फायटर चे बटन दाबून ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला मात्र बटन ऑपरेट न झाल्याने ना विलाज झाला. यानंतर पाचच मिनिटांमध्ये सर्व प्रवासी खाली उतरले व नंतर काही कालावधीमध्ये बस णे मोठ्या प्रमाणात आगीने रुद्ररूप धारन केलं.

आगीचे लोळ सर्वत्र लांबपर्यंत दिसत होते यामुळे रस्त्यावरील वाहतूक जवळपास 50 मिनिटे बंद झाली होती. महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार तडवी अरुण शिरसाठ निलेश ताडगे नितीन मेहर नांदूर शिरूर गोटे दूर क्षेत्राचे हवालदार चव्हाणके रवी मंडलिक हे घटनास्थळी भोसले व वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी परिसरात घेतले सुरुवातीला एका साईडने वाहतूक सुरळीत केली त्यानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करण्यात आली सिन्नर येथून अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी आले यांनी आग बुजवली परंतु शिवशाही एसटी बस जळून पूर्ण खाक झाली होती. दरम्यान एसटी बसचे होणारे अपघात यामुळे एसटी प्रवासी घाबरले आहेत. शिवशाही बसचे होणारे अपघात व आगीच्या घटना ताबडतोब एस टी महामंडळ तर्फे थांबाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे