ब्रेकिंग

मनसे कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून बुजवले खड्डे. सिडको भागात खड्ड्याचे साम्राज्य.

*मनपा खड्डेयुक्त रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार व जनतेला चांगले रस्ते कधी मिळणार*?
*मनपाला कोणी डांबर देतं का डांबर*.

*नविन नाशिक प्र. क्रं. 29 मधील विजयनगर ते दत्त चौक मुख्य डांबरी रस्त्यात गेल्या 6 महिन्यापासुन ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत, खड्ड्यांबद्दल मनपा विभागीय कार्यालयात मनसेच्या वतीने निवेदन देऊन देखील खड्ड्यांची दुरुस्ती व डांबरीकरण केले जात नसल्यामुळे आज मनपा प्रशासन चा निषेध म्हणून मनसेच्या वतीने स्वखर्चातुन माती व मुरुम टाकुन खड्डे भरण्यात आले, खड्डे भरत असतांना परिसरातील व रस्त्याने ये जा करणारे नागरिकांनी खड्डे माती व मुरुम टाकुन भरल्यामुळे मनसेच्या पदाधिकारींचे आभार मानले. त्याप्रसंगी *मनसे नाशिक शहर संघटक अर्जुन वेताळ, देवचंद केदारे ,वहातुक सेना उपशहराध्यक्ष प्रविण महाले, मनविसे शहर सचिव शंकर कनकुसे, दुर्गादास परदेशी, राहुल खैरनार, ईश्वर कदम* हे उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे