नादगाव येथे शेतकरी व वन विभागाने वाचवले मोराचे प्राण.
नाशिक जनमत प्रतिनिधी समाधान सोमासे यांच्याकडून .गेल्या काही दिवसापासून नांदगाव परिसरामध्ये कडक उन्हामुळे पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाण्यासाठी मोर देखील व्याकूळ होतात. नांदगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या गावात मोरांची संख्या मोठी आहे. दरम्यान काल अशीच एक घटना घडली. नांदगाव जवळील जगधने वाड्याजवळ रात्री अंधारात पाण्यासाठी वणवण फिरणारा एक मोर व्हेरी मध्ये पडला. परंतु त्याला विहिरीच्या बाहेर येता येत नव्हते. यावेळी रात्र त्याने विहिरीतच काढली सकाळ होताच मोराचा आवाज शेतकऱ्याला आल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील
विहिरीजवळ आले. त्यांनी ही गोष्ट नांदगाव वन विभागाला कळवली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर आले. यावेळी विहिरीमध्ये खाड सोडण्यात आली. तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोरास सुखरूप बाहेर काढले. व मोराचे प्राण वाचवले. याकामी परिसरातील शेतकरी तसेच मनोज थोरे यांनी कौतुकास्पद मोराचे प्राण वाचण्यासाठी मेहनत घेतली आज सकाळी आठ ते साडेआठ या दरम्यान मोराला सुखरूप बाहेर काढण्यात आले मागे पंधरा दिवसापूर्वी नांदगाव तालुक्यातील आमोदे या गावी पंधरा मोर मृत्युमुखी पडले होते दरम्यान शेतकरी वर्गाने व वन विभागाने मोराचे प्राण वाचल्याने वन विभाग कर्मचारी व शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे नासिक जनमत तर्फे सर्व रेस्क्यू टीमचे अभिनंदन पशुपक्ष्यांचे जीव वाचलेच पाहिजे राष्ट्रीय पशुपक्षी देणगी आहेत. सरकारने उन्हाळ्याच्या दिवसात पशुपक्ष्यांसाठी शेततळे तयार करावीत या भागात हरणे देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी वन विभागाने योग्य काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.