कासारीच्या घाटात दोन अवजड वाहने नादुरुस्त झाल्याने तब्बल सहा तास रहदारी ठप्प. वाहनांच्या दुतर्फा सोळा किलोमीटर रांग

कासारीच्या घाटात दोन अवजड वाहने नादुरुस्त झाल्याने तब्बल सहा तास रहदारी ठप्प.
वाहनांच्या दुतर्फा सोळा किलोमीटर रांग
अरुण हिंगमिरे
पत्रकार नांदगाव
नांदगाव तालुक्यातील कासारी घाटात सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने दोन अवजड वाहने नादुरुस्त झाल्याने नांदगाव तालुक्यातील जळगाव खु.आणी वैजापूर तालुक्यातील लोनी या गावांपर्यंत तब्बल सोळा किलोमीटर दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान काही ठिकाणी मोटारसायकल सुध्दा जान्या इतपत जागा रस्त्यावर शिल्लक नव्हती. दरम्यान वैजापूर तालुक्यातील शिउर येथील पोलिस ठाण्यातील दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाहतूक सुरळीत केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नडचा औट्रम घाट दि.११ ऑगस्ट पासून जड वाहतूकीसाठी उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार बंद करण्यात आल्या पासून देशाच्या दक्षिण उत्तर राज्यात जानारी सर्व वाहनांची वर्दळ कन्नड तालुक्यातील पानपोही आणि वैजापूर तालुक्यातील शिउरबंगला मार्गे तलवाडा ते नांदगाव तालुक्यातील कासारी हुण राज्य मार्ग २६ वरुन वळविण्यात आली आहे.
दरम्यान कासारी ते तलवाडा या दोन्ही नाशिक आणि छ. संभाजी नगर या पाच किलोमीटर अंतरात वन विभागाच्या जवळपास तीन किलोमीटर हद्दीतून हा राज्य मार्ग जात असल्याने वन विभागाच्या हद्दीत वरील रस्त्याची डागडुजी किंवा नुतनीकरण करण्यास परवानगी मिळत नसल्यानेगेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून घाटातील या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असून, मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने आगोदरच मनमाड येथून मराठवाड्यात इंधन वाहतूक करणाऱ्या टॅंकर, मालेगाव नांदगाव येथून छ.संभाजी नगर, जालना जानार्या परिवहन महामंडळाच्या बस आणि इतर वाहनांमध्ये औट्रम घाट बंद केल्याने अवजड वाहनांची वळविण्यात आलेल्या वाहतूकीची भर पडल्याने कासारी घाटातील खराब झालेल्या रस्त्यावर अवजड वाहतूक करणारे वाहने रस्त्यावर नादुरुस्त होत असल्याने वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी ठप्प होते आहे.
दरम्यान या परिसरात राहणारे नागरिक आणि शेतकऱ्यांना शेती माल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.