
, नाशिक जन्मत आम्ही पोलिस होत असं बनाव करून वाहनांवर पोलिसाच्या गाडीचा दिवा लावत जवळ हत्यारे बाळगत अनेकांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
वाहनावर पोलिसांचा दिवा, सोबत घातक सबमशिन गन, तपास यंत्रणांचे बनावट ओळखपत्र, देहबोलीत पोलिसांचा तोरा अशी एखाद्या सिनेमाप्रमाणे ‘हायप्रोफाइल’ लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नाशिक शहर पोलिसांनी अटक केली. पंचवटीतील एका तरुणाला ७० लाखांना लुटणाऱ्या टोळीकडून मशिनगन, रिव्हॉल्व्हर, बनावट ओळखपत्रांसह शिक्के असा ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या माहितीनुसार, उमाशंकर वर्मा (४०, रा. उत्तर प्रदेश), सुजीतकुमार दुबे (३२, रा. झारखंड), नीलेश पका (२७, रा. वसई) व संगीता अहिरे (रा. कोणार्कनगर, मूळ रा. जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पंचवटीतील दक्षेशकुमार प्रजापती (२९) हे दिंडोरी नाका येथील कंपनीत कार्यरत आहे. ते ८ जुलैला कंपनीच्या व्यवहारासाठी ७० लाखांची रक्कम घरी नेत होते. त्यावेळी लाल दिव्याच्या कारमधून आलेल्या संशयितांनी त्यांना वाहनात बसवले. कारमध्ये एक महिला व चालक होते. ७० लाख रुपये, मोबाइल हिसकावून संशयितांनी मुंबईच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, ही कारवाई बनावट असल्याच
संशय आल्याने प्रजापतींनी पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांच्या सायबर, रेकी पथक, क्यूआरटी अशा ३४ अंमलदारांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.
.
संशयितांकडे ‘एमपी ५’ यासारखी एक बंदूक होती. त्यानुसार सीसीटीव्ही आले. कारच्या तपासण्यात क्रमांकावरून माहिती मिळवून पोलिसांनी वेशांतर करून
संशयितांचा माग काढला. संशयित महिला नाशिकमधील असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. बिटको चौक ते जेलरोड परिसरात सोमवारी सायंकाळी कार पोलिसांचा दिवा लावून फिरताना दिसली, पोलिसांनी ती ताब्यात घेतल्यावर एकाकडे रिव्हॉल्वर सापडले. कारच्या पुढील आसनाखाली सब मशिनगन, तर इतर भागात उर्वरित मुद्देमाल आढळला. अनेक बनावट ओळखपत्र. विविध हत्यारे या आरोपींकडे मिळून आले आहे. ह्यात्याराचा वापर कुठे केला की काय तपास केला जातोय


