ब्रेकिंग

न्यू मराठा हायस्कूलच्या विराज लोंढे चा बालरंगभूमी परिषद आयोजित गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक.

*न्यू मराठा हायस्कूलच्या विराज लोंढे चा बालरंगभूमी परिषद आयोजित गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक*

 

*नाशिक* : मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूल मधील विद्यार्थी विराज अतुल लोंढे याने बालरंगभूमी परिषद, नाशिक शाखा आयोजित गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले.या स्पर्धेत विराजने ‘पिंगळा’ हे पारंपरिक लोकगीत सादर केले. पिंगळा ही महाराष्ट्राच्या प्राचीन लोकपरंपरेशी जोडलेली सांस्कृतिक लोककला असून, तिच्या माध्यमातून लोकजीवन, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर वारसा जपला जातो. विशेष अभिमानाची बाब म्हणजे लोप पावत चाललेल्या आपल्या लोककला आणि लोकसंगीताच्या समृद्ध परंपरा जपण्यासाठी विराज सातत्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. आपल्या संस्कृतीचा हा अनमोल वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे त्याचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

विराजच्या सुरेल आवाजाला मिळालेले हे प्रथम पारितोषिक म्हणजे त्याच्या मेहनतीचे, कलेवरील प्रेमाचे आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे सुंदर फलित आहे.त्याच्या या यशाचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे सर्व पदाधिकारी, संचालक,सेवक संचालक, शिक्षणाधिकारी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड लक्ष्मणजी लांडगे सर्व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे