ब्रेकिंग

जागतिक हृदय दिन जनजागृती कार्यक्रम उत्साहात

*जागतिक हृदय दिन जनजागृती कार्यक्रम उत्साहात*

नाशिक जनमत    नाशिक: विद्या प्रसारक समाज संचलित वणी येथील होरायझन अकॅडमीत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक हृदय दिनानिमित्त ‘World Heart Awareness Programme’ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. अनिल पवार यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. अनिल पवार यांना प्रमुख मार्गदर्शक व अतिथी वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले.
डॉ. अनिल पवार यांनी विद्यार्थ्यांना हृदयाची रचना, हृदयाचे कार्य आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनशैलीविषयी अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. सकस व संतुलित आहार, योग्य आहार-विहार, नियमित व्यायाम, आरोग्यदायी सवयी आणि हृदयाच्या आरोग्याची

 

 

काळजी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हृदयाच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर खुळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली काळे यांनी आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे